सह्याद्री देवराई गोपाल कृष्ण मोहाडी येथे दि.१६ रोजी चला सावली पेरूया कार्यक्रम...

सह्याद्री देवराई गोपाल कृष्ण मोहाडी येथे दि.१६ रोजी चला सावली पेरूया कार्यक्रम...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे सह्याद्री देवराई महाराष्ट्र आयोजित चला सावली पेरू या या कार्यक्रमाचे शुक्रवार दिनांक १६ रोजी देवराईचे प्रवर्तक सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप हे उपस्थित राहणार असून सकाळी ९ वा. वृक्ष दिंडीसह गावातून आभार फेरी,१० वा. के आर टी विद्यालय येथून विद्यार्थ्यांसोबत नाविन्यपूर्ण कार्यक्रम चला सावली पेरूया, ११ वा. सह्याद्री देवराई गोपाल कृष्ण मोहाडी सोलर व पॅनल संचाचे उद्घाटन,११.३० प्रातिधी स्वरूपात सन्मान सोहळा, दुपारी १२ वा. वृक्षारोपण /चित्रीकरण होणार असून यावेळी सचिन चंदने व योगेश पंदरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी परिसरातील वृक्ष प्रेमींनी व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन सह्याद्री देवराई गोपाल कृष्ण मोहाडी यांनी केले आहे.