खासदार भगरे यांची मोहाडी श्रीकृष्ण मंदिराला भेट...

खासदार भगरे यांची मोहाडी श्रीकृष्ण मंदिराला भेट...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे सर यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने मोहाडी येथील पुरातन अष्टबाहू गोपालकृष्णाचे तसेच ग्रामदैवत मोहाडमल्ल व मोहेश्वर मंदिराचे भेट देऊन दर्शन घेतले. याप्रसंगी खासदार भगरे यांनी मंदिरातील भाविक भक्त व महिला भगिनींशी संवाद साधला. गोपालकृष्ण मंदिरात देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उत्तमराव जाधव तर मोहेश्वर मंदिरात दिलीप सोमवंशी यांनी खासदार भगरे यांचा सत्कार केला. याप्रसंगी देवस्थान ट्रस्टचे जयंत जोशी,मुकुंद पाटील,विलास पाटील, प्रवीण डिंगोरे,सुधाकर सोमवंशी,लक्ष्मण देशमुख,सुदाम जाधव, अशोक जाधव,रत्नाकर निकम, भगवान गायकवाड, ललीत देशमुख सह ग्रामस्थ उपस्थित होते.

मोहाडी ग्रामस्थांच्यावतीने खासदार भगरे यांचा सत्कार करताना ट्रस्टचे अध्यक्ष उत्तमराव जाधव आदी...