शहीद यशवंत ढाकणे यांचे कार्य प्रेरणादायी - पो.निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे

शहीद यशवंत ढाकणे यांचे कार्य प्रेरणादायी - पो.निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे

NEWS15 प्रतिनिधी - बापू चव्हाण

दिंडोरी : तळेगाव दिंडोरी येथील शहीद यशवंत ढाकणे यांनी देश सेवेसाठी बलिदान दिले आहे. त्यांची प्रेरणा घेऊन विद्यार्थी युवकांनी देशसेवा करण्यासाठी पुढे यावे असे प्रतिपादन; दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी केले आहे. ३ऑगस्ट हा दिवस  शहीद यशवंत ढाकणे यांचा स्मृतिदिन म्हणून साजरा करण्यात आला त्याप्रसंगी ते ढोकणे बोलत होते.

शहीद यशवंत ढाकणे यांच्या स्मारकाचे पूजन दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पुष्पचक्र माजी सैनिक संघटनेच्यावतीने अर्पण करण्यात आले. त्याप्रसंगी दिंडोरी पोलीस ठाण्याचे  पोलिस निरिक्षक ढोकणे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, देशसेवा घडताना सर्वांच्या पुढे जाऊन शत्रूवर हल्ला चढत असे यावरून त्यांच्या मनात देशाबद्दल किती अभिमान असेल आणि हेच भाग्य आपल्या गावाला आणि तालुक्याला लाभले आहे. शहीद यशवंत ढाकणे यांचा आदर्श घेऊन सैन्य दलात भरती व्हावे असे आवाहन ढोकणे यांनी केले. यावेळी शहिद स्मारक येथिल ध्वजाचे ध्वजारोहण पंढरिनाथ ढोकणे यांच्या हस्ते पार पडले. शहिद यशवंत यांच्या कुटुंबियांच्या हस्ते फुलहार अर्पण करण्यात आला व माजी सैनिक संघटनेच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. डॉ.असोसिएशनच्या वतीने डॉ. ज्ञानराजे यांनी पुष्पहार अर्पण केला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष पंढरिनाथ ढोकणे हे होते तर प्रमुख पाहुणे डाॅ.असोसियशनचे डाॅ. ज्ञानराजे,  माजी सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजय कतोरे, तालुकाध्यक्ष भारत खांदवे, विरनारी जिल्हा संघटना अध्यक्ष रेखाताई खैरनार, माजी सैनिक गणपतराव जाधव, संजय खांदवे, हिरामण पिंगळ, उत्तम बैरागी, बलवंत  ढाकणे, उत्तम बुनगे, दत्ता गाडे, अमर निरघुडे, तारकेश्वर भामरे, शिवाजी हरक सरपंच सोनाली चारोस्कर, उपसरपंच प्रवीण कथार, ग्रा.पं.सदस्य लखन चारोस्कर, सारिका चकोर, गायञी मिसाळ, दिंडोरी सर्कल भारती रकीबे, मुख्याध्यापक राजेंद्र पितृभक्त, तलाठी एस एस गोसावी पोलिस पाटील रोशन परदेशी, माजी उपसरपंच सुदाम ढाकणे, बाळासाहेब चकोर, अजय चारोस्कर, शाम परदेशी, दौलत ढाकणे, बाळासाहेब ढाकणे आदी सह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आलेल्या अतिथींचा सत्कार माजी सैनिक संघटनेच्यावतिने  करण्यात आला. तर इयत्ता १०वी ला प्रथम, व्दितीय, तृतिय आलेल्या विद्यार्थ्यांचे शाल / श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी आलेल्या अतिथींचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी किर्ती मधुकर खुर्दळ यांनी शहिद यशवंत ढाकणे यांच्या विषयी माहिती दिली. शहिद यशवंत ढाकणे यांचे कुटुंबियांकडुन शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. सुञसंचालन  सुदाम ढाकणे यांनी केले. तर आभार तलाठी एस. एस. गोसावी यांनी मानले.

दहावी गुणवंत विद्यार्थी सत्कार- 

शहीद यशवंत ढाकणे यांच्या स्मृतिदिन निमित्त अखिल भारतीय माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष भारत खांदवे यांच्या पुढाकाराने दिंडोरी तालुक्यातील पिंपळणारे, ढकाबे, मोहाडी, मडकीजाब,राशेगाव उमराळे, रामशेज, दिंडोरी आदी माध्यमिक विद्यालयात कार्यक्रम संपन्न होत आहे. यावेळी माजी सैनिक संघटनेच्या वतीने शहिद यशवंत ढाकणे यांच्या स्मरणार्थ, कार्यास उजाळा व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून इयत्ता दहावीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रोत्साहन म्हणून सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी ग्रामस्थ महिला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.