ग्रामीण भागातील नागरिकांनी साथीच्या आजाराबाबत काळजी घ्यावी - वैद्यकीय अधिकारी श्री. मांडगे
![ग्रामीण भागातील नागरिकांनी साथीच्या आजाराबाबत काळजी घ्यावी - वैद्यकीय अधिकारी श्री. मांडगे](https://news15marathi.com/uploads/images/202308/image_750x_64ce1bf1ddd2d.jpg)
NEWS15 प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी : सध्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या रिमझिम पावसाची रीपरीप व भोवतालच्या वातावरणामुळे नागरिकांच्या शरीराची आरोग्य क्षमता कमी होत असल्याने, नागरिकांची खाजगी व ग्रामीण रुग्णालयात गर्दी होत असल्याने रुग्णालयातील नोंदीवरून लक्षात येत आहे. यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार बळावत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी व वैद्यकीय सल्ला घ्यावा असे आव्हान तालुका वैद्यकीय अधिकारी सुभाष मांडगे यांनी केले आहे.
ग्रामीण भागामध्ये रुग्णालयात व इतर खाजगी रुग्णालयांमध्ये सकाळी व दुपारनंतर ओपीडी वाढत आहे. साथीचे आजार बळावू नयेत यासाठी ग्रामीण यंत्रणा सतर्क आहे. रुग्णांमध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक असून पुरुषांचे प्रमाण महिलांपेक्षा कमी आहे मात्र असे असले तरी ग्रामीण भागात आजही सरकारी रुग्णालयावर रुग्णांचा विश्वास आहे.त्यामुळे त्याकरता तालुक्यातील यंत्रणा सक्षम करणे साथीचे आजार बळावू न देणे, द्वारे यासाठी गाव पातळीवर तपासणी नागरिकांची सोय करणे गरजेचे आहे. सरकारी आकडेवारीनुसार सध्या तरी डोळ्यांच्या साथीच्या व्यतिरिक्त कुठेही साथीचे आजार नसल्याचे समोर येत असली तरी ग्रामीण भागात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी रुग्णांनी डोळ्यांबरोबर इतर साथींच्या आजाराची काळजी घ्यावी असे आवाहन सुभाष मांडगे यांनी केले आहे.