नमस्ते नाशिक फाउंडेशनच्यावतीने मोफत फिजिओथेरपी तपासणी संपन्न...

नमस्ते नाशिक फाउंडेशनच्यावतीने मोफत फिजिओथेरपी तपासणी संपन्न...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

“जिथे कमी तेथे आम्ही “या उक्तीवर चालणाऱ्या नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक यांच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने; नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक व गोखले एज्युकेशन सोसायटीचे सर डॉ. मो. स. गोसावी भौतिकोपचार महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने.! मोफतफिजिओथेरपी तपासणी व त्यावरील उपचाराचे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

बरेचसे आजार असे आहेत जे औषधाविना व न शस्त्रक्रिया करता व्यायामाद्वारे सुद्धा बरे होऊ शकतात यासाठी फिजिओथेरपी ही सोपी व आधुनिक उपचार पद्धती खूप फायदेशीर ठरते. शिबिरात १०० हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली व त्यांना फिजिओथेरपी विषय मार्गदर्शन करण्यात आले.डॉ.राकेश जाधव डॉ. अर्चना बोधले डॉ.श्रद्धा कोठावळे,डॉ.  प्रियंका अहिरे यांनी रुग्णांची तपासणी व त्यावर मार्गदर्शन केले.

 नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.स्नेहल देव यांनी सगळ्यांचे आभार मानले.शिबिरास खालील अजय बोरस्ते,साहेबराव पाटील उज्वला पाटील,अनिल नाहर, राजेंद्र डुंगरवाल,अनिल बाफना,   संजय सोनार,राजेंद्र पवार,विजय शिरसाठ,रोहित पारख संदीप महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी पार पडण्यासाठी,  राजेंद्र गुप्ते,नमस्ते नाशिक फाउंडेशनचे खजिनदार संदिप देव, यांनी विशेष परिश्रम घेतले.