वरवंडी येथे पशु वंध्यत्व शिबिर संपन्न...
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
शेतकर्यांचा शेतीला मुख्य जोडधंदा म्हणजे दुग्ध व्यवसायाकडे बघितले जाते आणि त्या व्यवसायामध्ये कशा पद्धतीने शेतकर्यांनी प्रगती करावी याविषयी महाराष्ट्र शासनाच्या जनावरांवरील वंध्यत्व समस्या विषयी वरवंडी येथे मार्गदर्शन व उपाययोजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आदिनाथ साबळे यांनी दरवर्षी मिळवू एक वासरू वंध्यत्व निवारणाची कास धरून या घोषवाक्याला आधारून जनावरांची काळजी कशी घ्यावी याविषयी गाई,म्हशींच्या लैंगिक तपासणी दर महिन्यात नेहमीत करून घ्यावी रोगप्रतिबंधक लसीकरण करावे,गोचीड प्रतिबंधक उपाय व गोठ्याची स्वच्छता राखावी, जनावरांच्या आहारासंबंधी पशुवैदगांकडून मार्गदर्शन घ्यावे तसेच मोड आलेलीत कडधान्य 30 ते 60 ग्रॅम खनिज मिश्रण स्वरूपात द्यावे, चाटण वीट गावाने गुरांसमोर टांगून ठेवावी अशा विविध उपाय करून जनावरांची काळजी घ्यावी असे आवाहन डॉ.आदिनाथ साबळे करून त्याबाबत माहिती दिली. याप्रसंगी वरवंडी उपसरपं जयश्री जाधव,गोकुळ जाधव,निलेश जाधव,रवी गुंबाडे,विशाल जाधव,आदेश लोणारी आदींसह शेतकरी उपस्थित होते.