चाकण ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक व वैद्यकीय अधिकारी यांच्यातील संघर्ष शिगेला...!
![चाकण ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक व वैद्यकीय अधिकारी यांच्यातील संघर्ष शिगेला...!](https://news15marathi.com/uploads/images/202306/image_750x_647de2c0c2588.jpg)
News15 मराठी प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : औद्योगिक वसाहतीची व्याप्ती बघता चाकण शहरातील ग्रामीण रुग्णालयाची अवस्था अतिशय दैनिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यातच चाकण ग्रामीण रुग्णालयात आता वैद्यकीय अधिक्षक व वैद्यकीय अधिकारी यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला असल्याचे समोर आले आहे.
खेड तालुक्यातील चांडोली गावातील ग्रामीण रुग्णालयातील एक वैद्यकीय अधिकारी यांची बदली जिल्हा शल्यचिकित्सक यांनी चाकण ग्रामीण रुग्णालयात केल्याचे अधिकृत पत्राद्वारे आदेश दिले. पण चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक मॅडम या चांडोली येथील डॉक्टर यांना हजर करून घेण्यास टाळाटाळ करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कोणत्या तरी हेतुपरस्पर गोष्टीमुळे दोन वेळा वरिष्ठ अधिकारी यांनी आदेश देऊनही चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक मॅडम त्या डॉक्टरांना हजर करून घेत नसल्याने आता थेट त्या वैद्यकीय अधिकारी यांनी अधीक्षक मॅडम यांची लेखी तक्रारच वरिष्ठांकडे केल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
वैद्यकीय अधिकारी यांनी केलेल्या तक्रारीत अधीक्षक मॅडम यांच्या बद्दल शासनाच्या नियमांना तिलांजली देऊन मॅडम कसा कारभार करतात याचे पुरावे देऊन वरिष्ठ पातळीवर तक्रार केली असल्याचे समोर आले आहे. या वैद्यकीय अधिक्षक व वैद्यकीय अधिकारी यांच्या वादाबद्दल News15 मराठी वाहिनीचे प्रतिंनिधी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक मॅडम यांच्या बद्दल सपशेल हतबलता व्यक्त केली. जर असे अधिकारी वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असतील तर, हे खरच सर्व सामान्य जनतेच्या पैशाचा पगार घेऊन गोरगरीब जनतेची प्रामाणिक सेवा करत असतील का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.
चाकण ग्रामीण रुग्णालयाचे वास्तव बघितले तर, ते रुग्णालय येवढ्या मोठ्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील रुग्णालय आहे हे सांगणे कोणत्याही चाकणकर वाशियाला लाजिरवाणे ठरेल अशीच काहीशी परिस्थिती या रुग्णालयाची होऊन बसली आहे. त्याकडे लक्ष न देता अधीक्षक मॅडम हा अधिकारी नको, तो अधिकारी नको अशा बतावण्या करण्यातच व्यस्त असल्याचे समोर आले आहे. ज्यावेळी आपण एखाद्याकडे बोट करतो त्यावेळी आपणही तितकेच नेटके राहायला हवे हे बहुतेक अधीक्षक मॅडम विसरल्या आहेत की काय? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. चाकण सारख्या ठिकाणी रुग्णाचा एवढा ओढा असताना जर कोणत्या तरी द्वेषातून किवा खुंशीतून एखाद्या अधिकार्याला हजर करून घ्यायचे नाही यात मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. उद्या एखाद्या रुग्णाला अपुरे किवा वेळेत उपचार मिळाले नाहीत तर त्याच्या जीवितास काही धोका निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अधीक्षक मॅडम घेतील का? असाही प्रश्न विचारण्याची वेळ आता सर्व सामान्य नागरिकांवर आली आहे.
या चाकण ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक व वैद्यकीय अधिकारी यांच्या वादावर नक्की कोण? व कसा पडदा टाकणार? हेच पहावे लागेल. नाहीतर यातून बर्याच अधीक्षक मॅडम यांच्या अनाकलनीय गोष्टी बाहेर आल्या शिवाय राहणार नाहीत.