कादवाच्यावतीने दिंडीच्या भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी औषधोपचार सेवा...

कादवाच्यावतीने दिंडीच्या भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी औषधोपचार सेवा...

NEWS15 मराठी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने, संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज, श्रीक्षत्र  त्र्यंबकेश्वर येथील यात्रे निमित्ताने पायी जाणाऱ्या दिंडीतील भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषध उपचार शिबिर सेवा; संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचे शोधक ह.भ.प.पाटील बाबा यांच्या जोपूळ येतील मानाच्या दिंडीतील वारकरी भक्तांची शिवनई येथे मोफत आरोग्य तपासणी व औषध उपचार सेवा करण्यात आली.

त्याचे उद्घाटन वारकरी संप्रदायाचे ह.भ.प.पांडुरंग महाराज गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डॉ.तिडके, सेवाधारी व वारकरी ग्रामस्थ उपस्थित होते.