दिंडोरी येथे 25 डिसेंबर रोजी "दिंडोरी मॅरेथॉन'चे आयोजन...
![दिंडोरी येथे 25 डिसेंबर रोजी "दिंडोरी मॅरेथॉन'चे आयोजन...](https://news15marathi.com/uploads/images/202212/image_750x_63a6af01ab777.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : बापू चव्हाण
नाशिक / दिंडोरी : डॉक्टर्स असोसिएशन संचालित राजश्री फाउंडेशन यांच्यावतीने रविवार दि.२५ डिसेंबर रोजी "दिंडोरी मॅरेथॉन" आयोजित करण्यात आले आहे. या मॅरेथॉनची सुरुवात संस्कृती लॉन्स नवीन कांदा मार्केट येथून मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
तरी तालुक्यातील नागरिकांनी या मॅरेथॉन मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन डॉक्टर असोसिएशन तसेच तहसीलदार पंकज पवार, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, उपनिरीक्षक चेतन लोखंडे यांनी केले आहे.