मसलगा ग्रामपंचायतच्यावतीने रोगराईपासून बचावासाठी धूर फवारणी...

मसलगा ग्रामपंचायतच्यावतीने रोगराईपासून बचावासाठी धूर फवारणी...

प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी, निलंगा

निलंगा तालुक्यातील मसलगा येथे डेंगू मलेरिया हे रोग होऊ नये म्हणून प्रति बंधात्मक उपाय करण्यात आले यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय मसलगा च्या वतीने सर्व वार्डामध्ये नाल्यामध्ये धुरपवारणी करण्यात आली.

यावेळी सरपंच गणेश शेळके यांनी गावामध्ये कसलीही रोगराई होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आम्ही वेळोवेळी अशा प्रकारचा उपक्रम राबवत असल्याचे सांगितले.

यावेळी ग्रामपंचायतचे सेवक सुरेंद्र जाधव व अंगद हालसे यांनी या कामासाठी परिश्रम घेतले आहे.