विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे 100,500 रुपयाचे स्टॅप बंद न करण्याची गवारे मागणी...
![विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे 100,500 रुपयाचे स्टॅप बंद न करण्याची गवारे मागणी...](https://news15marathi.com/uploads/images/202310/image_750x_653215f1828d0.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
महाराष्ट्र राज्यात मुद्रांक विक्रेत्यांमार्फत सुरु असलेल्या 100 व 500 रुपयाचे मुद्रांक विक्री व्यवस्था मुद्रांक विक्रेत्यांमार्फतच सुरु ठेवण्यात यावे,या मागण्यांचे शासकीय परवाना धारक मुद्रांक विक्रेता,अर्ज व दस्तलेखक संघटनेच्या वतीने संघटनेचे नाशिक जिल्हा विभागीय अध्यक्ष शाम गवारे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना निवेदन दिले आहे.
महाराष्ट्र राज्यातील मुद्रांक विक्रेता,अर्ज व दरत लेखक हे इंग्रज काळापासुन जनता व शासन यातील दुवा म्हणुन काम करत आहेत.या कामातुन शासनास प्रती वर्षी कोट्यावधी रुपयाचा महसुल मिळवुन देण्यात आम्ही महत्वाची भूमिका साकारत असतो. त्या बदल्यात शासन आम्हांस तुटपुंज्या स्वरुपात कमिशन, लिहीनावळ फि देत असते.असे असतांनाही सन 2004 मध्ये राज्यात तेलगी नावाच्या इसमाने बनावट मुद्रांकाची विक्री करून शासनास लुबाडले. त्यात परवाना धारक मुद्रांक विक्रेत्यांचा काही एक सहभाग नव्हता.शासन निर्णयात मुद्रांक विक्रेत्यांचे नुकसान होऊ नये,त्यांची रोजीरोटी शासनाने हिसकासुन घेऊ नये,मुद्रांक विक्रेत्यांचे कुटुंब रस्त्यावर येऊन त्यांची उपासमार होऊ नये म्हणुन राज्यातील मुद्रांक विक्रेता, अर्ज व दस्त लेखक यांच्या शासकिय परवाना धारक मुद्रांक विक्रेता,अर्ज व दस्तलेखक संघटनेने वेळ पडल्यास आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करणार असून राज्याच्या महसुल मंत्री महोदयांनी रुपये 100 व 500 चे मुद्रांकाची छपाई बंद करून फ्रेंकिंग व्यवस्थेद्वारे मुद्रांकाची विक्री करण्याचे शासनाचे धोरण आहे.म्हणजेच 100 व 500 रुपयांचे मुद्रांक बंद करून मुद्रांक विक्रेत्यांचा व्यवसाय संपविणे म्हणजेच मुद्रांक विक्रेत्यांच्या व्यवसायावर बंधन आणने असाच आहे.शासन आता 100 व 500 रुपयांचे मुद्रांक फ्रँकिंगद्वारे विक्री करणार असल्याने आपोआपच मुद्रांक विक्रेत्यांचा व्यवसाय हा संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आपण 100 व 500 रु. चे मुद्रांक विक्री फ्रैंकिंगद्वारे करण्याचा निर्णय हा रद्द करण्यात यावा आणि 100 व 500 रुपयांचे स्टॅप कायमस्वरुपी चालू ठेवावे,आता शासन रुपये 100 व 500 या किंमतीचे मुद्रांक बंद करुन त्याच किंमतीचे क्रॅकिंग करणार असल्याने शासनाचा हेतु हा मुद्रांक विक्रेत्यांना संपविण्याचाच आहे व मुद्रांक विक्रेत्यांच्या व्यवसाय स्वतंत्र व मुलभूत हक्कांवर गदा आणणारा असल्याने शासनाने त्वरीत रुपये 100 व 500 या किंमतीचे मुद्रांक बंद करून त्याच किंमतीचे क्रॅकिंग करणार असल्याचा विचाराधिन असलेला निर्णय त्वरीत थांबवावा तसेच महाराष्ट्र राज्यात मुद्रांक विक्रेत्यांमार्फत सुरु असलेल्या 100 व 500 रुपयाचे मुद्रांक विक्री व्यवस्था मुद्रांक विक्रेत्यांमार्फतच सुरु ठेवण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.या मागण्या पुर्ण न झाल्यास संघटनेच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.निवेदनावर संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष शाम गवारे,कैलास देशपांडे,रमेश पगारे,कैलास गांगोडे, किरण चित्राव,गणेश आंबेकर,निलेश गायकवाड,lदावल सोमवंशी, सदाशिव जमधडे,घनश्याम चौधरी,सुकदेव उफाडे,नितीन झोटींग,हर्षल धर्माधिकारी,वसंत कतवारे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.