चाकण शहरात कचऱ्याचा बकाल कारभार.! नगरपरिषदेची उघडपणे बेफिकिरी...
प्रतिनिधी - विश्वनाथ केसवड, चाकण
चकणा: औद्योगिक दृष्ट्या विकसित असलेले चाकण शहर आज कचऱ्याच्या डोंगराखाली दबले असून नागरिक अक्षरशः घाणीमध्ये राहण्यास भाग पाडले गेले आहेत.
नगरपरिषदेकडून ठेकेदारांना वेळेत पैसे न दिल्याने सफाई कर्मचाऱ्यांनी कामबंद केल आणि त्याचा फटका थेट नागरिकांच्या आरोग्यावर बसला. रस्ते, चौक, बाजारपेठा, वस्त्या – सर्वत्र कुजका कचरा, दुर्गंधी आणि डास-माशांचा उपद्रव वाढून नागरिकांचे आयुष्य त्रस्त झाले आहे.
नगरपरिषदेला नागरिकांच्या जीविताची किंमत नाही का?
दर महिन्याला कर वसूल करणारे प्रशासन इतके निष्क्रिय का?
कामगारांच्या पगारात विलंब करून त्यांना संपावर का ढकलले जाते?
असे थेट सवाल नागरिक विचारत आहेत.
दररोज निर्माण होणारा प्रचंड कचरा उचलण्यासाठी गाड्या, मनुष्यबळ आणि नियोजन नसल्यामुळे ही वेळ आली असल्याची स्पष्ट कबुलीच नगरपरिषदेच्या दुर्लक्षातून मिळते. पावसाळ्यातील या कुजक्या कचऱ्यामुळे डेंग्यू, मलेरिया, श्वसनाचे आजार, त्वचारोग यांचा मोठा धोका वाढला आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कचऱ्याचे वर्गीकरण, प्रक्रिया प्रकल्प आणि औद्योगिक कंपन्यांकडून CSR निधीतून मदत न मिळाल्यास चाकण कायम कचऱ्याच्या अभिशापाखालीच राहणार आहे.