रोजच्या जीवनशैलीत नव तरुणांनी वेळ काढून परमार्थ करावा - गतीर

रोजच्या जीवनशैलीत नव तरुणांनी वेळ काढून परमार्थ करावा - गतीर

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी : आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये तरुणाई भरकट चालली असून आजच्या तरुणांनी रोजच्या जीवनशैलीत वेळातवेळ काढून परमार्थ करावा असे आवाहन हभ.प. भगवान महाराज गतीर यांनी केले.

पालखेड बंधारा येथे नुकतीच अखंड हरिनाम सप्ताहाची झाली. काल्याच्या कीर्तनाचा गतीर बोलत होते.सात दिवस चालणाऱ्या या सप्ताह मध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये कलश व गाथा ज्ञानेश्वरी पूजन विना टाळ मृदुंग पूजन काकडा भजन काकडा आरती हरिपाठ हरी किर्तन झाली महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार अभिजीत महाराज देशमुख,योगेश महाराज जाधव, निवृत्ती महाराज रायते,कृष्णा महाराज कमानकर,नरेंद्र महाराज गुरव,वैभव महाराज राक्षे, निवृत्ती महाराज चव्हाण,आदींचे कीर्तन झाली तर दि.१८ रोजी सायंकाळी पाच वाजता भव्य दिव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यामध्ये बालगोपाल सहभागी होऊन लहान मुलींनी डोक्यावर तुळशीवृंद घेऊन दिंडीमध्ये मुलांनी वारकरी संप्रदायाचा पोशाख परिधान करून हातामध्ये भगवे झेंडे घेऊन हरिनामाचा गजर केला.तर नव तरुणांनी तरुणींनी या दिंडीमध्ये वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार गोल रिंगण करून फुगडी खेळण्या साठीभाग घेतला होता तसेच गायक रमेश महाराज आखत वाडेकर व मिलिंद महाराज अजंग वडेल यांनी आपल्या स्वरांनी विठ्ठलाचे अभंग गाऊन दिंडीमध्ये सहभाग घेतला तर मृदुंगाचार्य रामदास महाराज रसाळ मृदुंगाच्या तालावर अनेकांना ठेका धरण्यास भाग पाडले.यावेळी सुहासिनी आपल्या घरापुढे सडा रांगोळी काढून दिंडीमधील पालखीची मनोभावे पूजा केली.यावेळी अन्नदाते म्हणून दिलीप गायकवाड,श्रीकांत गायकवाड,अशोक पवार,विठोबा गायकवाड,सिताराम कदम,परसराम गायकवाड,दिलीप निवृत्ती गायकवाड, श्रीमती शैलाताई दिघे, छबुराव मटाले, दिलीप गायकवाड, दीपक हेमाले, विठ्ठल कक्राळे,संजय मटाले,पुंडलिक कक्राळे,मिराबाई जगदाळे,आदींनी अन्नदान केले.तर गायकवाड,पवार, लोखंडे,जाधव,मटाले,कातडे, कक्राळे,भवर,हेमाले,चव्हाण, जगताप,सोनवणे,मिठे,यांनी आयोजक म्हणून भूमिका पार पाडली.सप्ताह काळात सातही दिवस परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.