महात्मा फुले महाविद्यालयात ऑलपिकवीर खाशाबा जाधव यांना विनम्र अभिवादन...
![महात्मा फुले महाविद्यालयात ऑलपिकवीर खाशाबा जाधव यांना विनम्र अभिवादन...](https://news15marathi.com/uploads/images/202401/image_750x_65a4db36b16ee.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख
अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयात सोमवार दि १५ जानेवारी, ऑलिंपिकवीर खाबाशा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रिडा दिन म्हणून साजरी करण्याचे निर्देश राज्य शासनाच्यावतीने देण्यात आले होते त्या अनुशंगाने मोठ्या उत्साहात जन्मदिन साजरा करताना खाबाशा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. बबनराव बोडके यांच्या शुभहस्ते करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बबनराव बोडके, प्रमुख पाहुणे श्री छञपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राम बोडके याची प्रमुख उपस्थिती होती यावेळी महाविद्यालयातील क्रिडा विभाग प्रमुख प्रा चेतन मुंढे, उपप्राचार्य डॉ. विठ्ठल चव्हाण, प्रा बालाजी आचार्य, प्रा संजय जगताप, प्रा. डॉ. विरनाथ हुमनाबादे, प्रा. डॉ. सदाशिव वरवटे, प्रा. डॉ. अनंत सोमवंशी, प्रा. पांडूरंग कांबळे, प्रा. पदमजा हगदळे,
उद्धवराव जाधव , प्रा गोपाळ इंद्राळे, इंद्रदेव पवार, आखिल शेख, अनिल भदाडे आदिसह राष्ट्रीय आणि राज्य खेळाडू कु जावेद पठाण , मुजहीन शेख, बालाजी डोंगरे, वाजाहाद खुरेशी हे विद्यार्थीउपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभा प्रा. डॉ. प्रभाकर स्वामी यांनी केले.