लालबाग काळाचौकी भागातील झोपडपट्टीला भीषण आग, 8 सिलेंडरचा स्फोट...
![लालबाग काळाचौकी भागातील झोपडपट्टीला भीषण आग, 8 सिलेंडरचा स्फोट...](https://news15marathi.com/uploads/images/202401/image_750x_65a4bbf1365aa.jpg)
NEWS15 मराठी रिपोर्ट - मुंबई
मुंबईतील लालबाग काळाचौकी जवळील गिरनार टाॅवरच्या मागील साईबाबा झोपडपट्टीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या अग्नितांडवात एकापाठोपाठ एक असे सिलेंडरचे आठ ब्लास्ट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. याठिकाणी जवळपास दिड हजार लोक या झोपडपट्टीमध्ये राहतात. महापालिकेचे आधिकारी कर्मचारी आग अटोक्यात आण्यासाठी प्रयत्न करत असून, सिलेंडरच्या स्फोटामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. तर फायर ब्रिगेडच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.
बंद असलेल्या बीएमसीच्या साईबाब पाथ स्कूल या शाळेमध्ये आग लागल्याची माहिती आहे. कोविडमध्ये या शाळेचा वापर केला गेला होता. त्यानंतर ही शाळा बंदच होती. मात्र त्या काळात वापरलेले ऑक्सिजन सिलेंडर तसेच पडून होते.
आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या आगीत अद्याप कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. बचावकार्यासाठी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. सिलिंडरचा स्फोट कशामुळे झाला, याचे कारण अद्यापही गुलदस्तात आहे.