पालखेड बंधारा गावात बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या एक बोकड ठार...
![पालखेड बंधारा गावात बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या एक बोकड ठार...](https://news15marathi.com/uploads/images/202312/image_750x_656b02101c923.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा गावात भरवस्तीमध्ये राहणारे मंगेश गोतरणे यांच्या घराच्या पाठीमागे शेडमध्ये बांधलेल्या दोन शेळ्या व एक बोकड यांच्यावर मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करत ठार केले.
गेल्या काही दिवसांपासून पालखेड गावात व परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून गाव परिसरातील नागरिकांचे शेतकऱ्यांचे मजुरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे काही ठिकाणी तर दिवसाढवळ्या शेतमजुरांना बिबट्याचे दर्शन होत असल्यामुळे शेतात मजूर येण्यास धजत नसल्याने शेतकरी वर्गाची कोंडी होत आहे काही दिवसांपूर्वी या बिबट्याने शेतकऱ्यांचे पाळीव कुत्रे गाई शेळ्या बकरे याशिवाय परिसरात चाऱ्यासाठी वन वन फिरणारे मेंढेपाळ यांच्याही मेंढ्या फस्त केल्या आहे दिवसेंदिवस बिबट्यांची दहशत वाढत असल्याने भविष्यात शेती व्यवसाय संकटात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे आज शनिवार दि.2 रोजी पहाटे घडलेल्या या घटनेमध्ये या बिबट्याने मंगेश गोतरणे यांच्या घराच्या मागच्या बाजूने प्रवेश करून शेडला ठोकलेले शेडनेट तोडून आत मध्ये घुसून दोन्ही शेळ्यांना व बोकड्यावर हल्ला करून ठार केले.तरी संबंधित विभागाने याची तात्काळ दखल घेऊन पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी केली आहे.