पाटणबोरी येथे नक्षणे कुटुंबाने केले जेष्ठा गौरी महालक्ष्मी पुजानाचे आयोजन...
प्रतिनिधी - गजु कैलासवार, यवतमाळ
पाटणबोरी येथील जेष्ठा गौरी महालक्ष्मी उत्साहत स्वागत करून साजरी करण्यात आले. दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी विधिपूर्वक व परंपरे नुसार पूजा आरती करून सुरुवात करण्यात आली. सोन्या मोत्याची पाऊली आली अंगणी गौराई झीमा पोगडी पूजा आरतीची घाई,अष्ट लक्ष्मी नांदू अशीच राहूदे माझ्या घरादारी याच अनुषंगाने प्राध्यापक अनिल नक्षणे व त्यांचे भाऊ पत्रकार संतोष नक्षणे यांच्या घरी देखणी अशी सजावट करून यांच्या घरी जेष्ठा गौरी महालक्ष्मी बसाविण्यात आली. व तसेच गावा मध्ये त्यांच्या घरी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. पाटण बोरी परिसरातील भाविक दर्शनासाठी व महाप्रसाद घेण्या साठी नक्षणे परिवार आपल्या घरी बहीण, जावई, भाचे, पुतणे व गावातील नाते गोते व नागरिक व मित्र परिवार बाहेर गावी असणाऱ्या कुटुंनबातील एकत्रित आणून श्रद्धा भावना परंपरा कायम राहावी व परिवारातील गुतवळा कायम राहावी व परिवारातील गोतावळा टिकून राहावा या निमित्याने हा कार्यक्रम घेतला जातो. ही परंपरा गेल्या 150 वर्षा पासून कायम असून आज गौरी महालक्ष्मी आंबील, कथली, महाप्रसादाचे महत्व असतें या प्रसादासाठी लोक भक्ती भावनेने येतात.
या वेळी गावाकऱ्यांना व परिसरातील भाविकांना घरी आमंत्रित केल्या जाते. त्याच बरोबर जेष्ठा गौरी महालक्षमीच्या आरत्या घेण्यात आल्या. अशा प्रकारे गौरी महालक्ष्मीच्या दर्शनाचा आणि महाप्रसादा चा लाभ घेतला.