निर्भीड पत्रकारिता करणे काळाची गरज - आबासाहेब मोरे

निर्भीड पत्रकारिता करणे काळाची गरज - आबासाहेब मोरे

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण

नाशिक : पत्रकारिता राजहंस पक्षा प्रमाणे असावी; जे दिसेल ते सत्य आहे हे समजण्या पेक्षा घटनेची सत्यता तपासून निर्भीड पत्रकारातीत करणे ही सद्याची गरज निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन स्वामी समर्थ सेवा केंद्राचे आबासाहेब मोरे यांनी पत्रकार दिनाच्या पूर्व संध्येला आयोजित परिसंवादाच्या वेळी केले.

ते पुढे म्हणाले की, सध्या ग्लोबल वार्मिंग मुळे हवामान बदलाचा सर्वाधिक फटका शेतीव्यवसायला बसला आहे. या मुळे आता शेतातील पीक पद्धती बदलली पाहिजे. भविष्यात शेतातील चांगले दिवस येतील पण त्या साठी शेतकऱ्यांनी विषमुक्त अन्नवर भर द्यावा असे आवाहन पण आबासाहेब मोरे यांनी या प्रसंगी केले.

यावेळी पत्रकार भगवान गायकवाड, नितीन गांगुर्डे, संतोष कथार, संदिप गुंजाळ, बापू चव्हाण, बाळासाहेब अस्वले, संदीप मोगल, अशोक निकम, सुनील घुमरे, किशोर जाधव, अशोक केंग, अमोल जाधव आदी पत्रकार उपस्थित होते.

यावेळी शेतकरी संघाच्या संचालक पदी निवड झालेले संतोष कथार व कालिका देवस्थानाच्या वतीने आदर्श पत्रकार पुरस्कार विजेते संदीप गुंजाळ यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी आबासाहेब मोरे यांनी स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.