खडक सुकेणे येथे आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे जयंती उत्साह...

खडक सुकेणे येथे आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे जयंती उत्साह...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील खडक सुकेने येथे क्रांतिवीर राघोजी भांगरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जवळके दिंडोरीचे सरपंच तुकाराम जोंधळे, कृ. उ. बाजार समितीचे संचालक दत्तू रे, अक्राळ्याचे उपसरपंच संदीप केंदळे आदींच्या हस्ते आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरे यांच्या भव्य शिल्पाकृती पुतळ्याचे पूजन व आरती करण्यात आली.

यावेळी तुकाराम जोंधळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप गोतरणे यांनी केले सायंकाळी मिरवणुकीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रवींद्र कोरडे, संकेत गुंबाडे, आकाश बदादे आदींनी परिश्रम घेतले.