आषाढी वारीसाठी नाथांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान...

आषाढी वारीसाठी नाथांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे चांदीच्या रथातून गुरुवारी दि.२० रोजी त्र्यंबक नगरीतून प्रस्थान केले. यावेळी हजारो वारकऱ्यांकडून निवृत्तीनाथांचा  जयघोष केला त्यानंतर नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. निवृत्तीनाथ समाधी मंदिर विश्वस्त मंडळाकडून तयारी करण्यात आली.

शासनातर्फे निर्मल वारीसाठी सव्वा दोन कोटीची मंजुरी मिळून जिल्हा परिषदेकडे निधी वर्ग करण्यात आला आहे. यावेळी हजारो वारकऱ्यांनी या पालखीचे दर्शन घेतले.