दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी चतुर्थ श्रेणी कर्मचारी प्रशिक्षण संपन्न...

दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी चतुर्थ श्रेणी कर्मचारी  प्रशिक्षण संपन्न...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी - १२२ विधानसभा मतदारसंघातील ३५७ मतदान केंद्रावर नियुक्त चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण आदिवासी विकास सांस्कृतिक विकास भवन येथे आयोजित करण्यात आले होते सदर प्रशिक्षण वर्गास मतदान केंद्रावर नियुक्त ४७१ पैकी ४२२ इतके चतुर्थ कर्मचारी उपस्थित होते. व ४९ इतके कर्मचारी विनापरवानगीने गैरहजर होते.गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येतील. सदर प्रशिक्षण वर्गात चतुर्थ कर्मचारी यांना भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदान केंद्रावर नियुक्ती देण्यात येणार आहे यातील बहुतेक चतुर्थ कर्मचारी हे स्थानिक असतात अशा सर्व कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली काम पहावे तसेच निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत प्रशिक्षणामध्ये सुचित करण्यात आले.

सदर प्रशिक्षणसाठी पेठ व दिंडोरी तालुक्यातील विविध विभागातील ४७१ कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत.सदर कर्मचाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, निपक्षपातीपणाने कामकाज करण्याबाबत प्रशिक्षणात निर्देशित करण्यात आले.सर्व कर्मचारी यांनी टपाली मतपत्रिका व निवडणूक कार्य प्रमाणपत्र बाबत नमुना१२ व१२ अ भरून देण्याबाबत बैठकीत सुचित करण्यात आले.सदर प्रशिक्षण वर्गास अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पेठ व दिंडोरी उपस्थित होते.