दिंडोरी नगरपंचायतीच्यावतीने अभिनव उपक्रम झाड भेट...
![दिंडोरी नगरपंचायतीच्यावतीने अभिनव उपक्रम झाड भेट...](https://news15marathi.com/uploads/images/202403/image_750x_65fc6b3372790.jpg)
NEWS15 प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
नगरपंचायतीच्यावतीने नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता कर, पाणीपट्टी,दुकान भाडे आदींसह विविध करांची वसुल मोहीम राबविण्यात येत असून थकबाकी वसुलीसाठी नगरपंचायतीने अभिनय उपक्रम हाती घेतला आहे.जे थकबाकीदार आपली मालमत्ता कर थकबाकी नगरपंचायतीत स्वतः आणुन भरतील त्यांना नगरपंचायतीच्यावतीने एक झाड देण्यात येणार आहे.या उपक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन नगरपंचायतीच्या वतीने मुख्याधिकारी संदीप चौधरी यांनी केले आहे,
मालमत्ता थकबाकीदारांचे नळ पाणीपुरवठा खंडित करण्याचे काम सुरू असून दुकान भाडे थकबाकीदारांवरही कारवाई करण्यात येत आहे नगरपंचायत हद्दीतील ज्या नागरिकांकडे थकबाकी आहे त्यांनी तात्काळ नगरपंचायतीत आपली थकबाकी भरुन नगरपंचायतीला सहकार्य करावे व पुढील होणारी कारवाई टाळावी असे आवाहन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चौधरी यांनी केले आहे.
चौकट
दिंडोरी शहरातील अनेक मालमत्ता धारक,व दुकानदारांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असुन थकबाकी वसुलीसाठी वसुली पथकाची नियुक्ती करण्यात आली असून नागरिकांनी आपल्याकडील थकीत कराचा भरणा तात्काळ नगरपंचायतीत करुन होणारी कटु कारवाई टाळावी,
दिंडोरी नगरपंचायतीच्यावतीने मालमत्ता कर भरण्यासाठी यावर्षी प्रथमच व्युआर कोडची व्यवस्था केली असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.