निळवंडी येथे जय कानिफनाथ पावासं सभागृहाचे उद्घाटन...
![निळवंडी येथे जय कानिफनाथ पावासं सभागृहाचे उद्घाटन...](https://news15marathi.com/uploads/images/202307/image_750x_64aa98c12fb07.jpg)
NEWS15 प्रतिनिधी - बापू चव्हाण
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथे वाघाड प्रकल्पावरील जय कानिफनाथ पावासं सभागृहाचे उद्घाटन; दि.७ जुलै रोजी डाॕ. संजय बेलसरे,सचिव (लाक्षेवि) जलसंपदा विभाग, मंत्रालय मुंबई यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने, सहाय्यक अभियंता निलेश वन्नेरे, वाघाड प्रकल्प स्तरीय पावासंचे अध्यक्ष अरुण घुमरे, शहाजी सोमवंशी, बाजीराव शिंदे, लक्ष्मीकांत वाघवकर, प्रविण पाटील आदि संस्थेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
संस्थेने रु.५.२५ लाख खर्च करुन, बांधलेल्या सभागृहाचे उद्घाटन डाॕ.संजय बेलसरे यांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर निळवंडीचे ग्रामदैवत हनुमान मंदिरात संस्थेचे अध्यक्ष सुनिल पाटील यांनी डाॕ. बेलसरे यांचे तसेच संस्थेचे संचालकांनी उपस्थित मान्यवराचे स्वागत केले. संस्थेचे सचिव सोमनाथ पठाडे यांनी प्रास्तविकात संस्थेने निळवंडी गांवाची सिंचनातून आलेली समृध्दी व झालेला बदलबाबत विवेचन केले. पाणी वापर संस्थांनी केवळ सिंचन व्यवस्थापनावर अवलंबून न रहाता त्यांनी कृषी क्षेत्रातील इतर पूरक व्यवसायातील उपक्रम राबविण्याचे व त्यातून शासनावरील आपले अवलंबित्व कमी करण्याचे आवाहन डाॕ. बेलसरे यांनी करुन, या पाणी वापर संस्था सक्षमपणे कार्यरत ठेवणे ही आता काळाची गरज असल्याने संस्था पदाधिकारी ते ठामपणे करतील; असा विश्वास व्यक्त केला. गेल्या तीन दशकापासून सुरु झालेली ही चळवळ सचिव पदाचे कारकिर्दीत अधिक प्रभावी करण्याचे सुतोवाचही त्यांनी केले.
निळवंडी गांवातील इ. १२ वी तील विद्यार्थीनी कु. ऋतुजा पाटील हिने पेन्सिलने रेखाटलेली डाॕ. बेलसरे यांची प्रतिमा तिच्या हस्ते पावासं व ग्रामस्थांचेवतीने पावासंचे आधारस्तंभ असल्याचे प्रतिक म्हणून भेट देण्यात आली. डाॕ. बेलसरे यांचे हस्ते कु. ऋतुजाचा विद्येची देवता सरस्वतीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सभेत सर्व मान्यवरांनी आपले मनोगतामध्ये पाणी वापर संस्थेची ही चळवळ अधिक जोमाने करण्याचा संकल्प व्यक्त केला. याप्रसंगी सरपंच मनीषा चारोस्कर, उपसरपंच भाऊसाहेब पाटील, कैलास पाटील, पोलीस पाटील अंबादास पाटील, गणेश हिरे, कानिफनाथ पाणी वाटप संस्थेचे चेअरमन सुनील पाटील, मधुकर पवार, श्याम पाटील, कचरू पवार, अण्णा पाटील, परसराम पाटील, इंदुबाई पाटील, चंद्रभागा पताडे, म्हाळसाबाई पाटील, पुंडलिक चारोस्कर, मनोज पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.