पेट्रोल पंपावरील डिझेल - पेट्रोलची गुणवत्ता ढासळली?

पेट्रोल पंपावरील डिझेल - पेट्रोलची गुणवत्ता ढासळली?

NEWS15 मराठी प्रतिनिधी - साहिल रामटेके, भंडारा

शहरी व ग्रामीण भागात प्रवासांच्या सुविधा आणि व्यवस्था निर्माण करण्याकरिता विविध वाहनांची उपलब्धता करण्यात आली आहे. त्यासाठी लागणारे इंधन पेट्रोल- डिझेल हे पंपाच्या साह्याने पुरविल्या जाते. मात्र काही पेट्रोल पंपावरील डिझेल - पेट्रोलची गुणवत्ता ढासळली असून त्यामुळे वाहनांचे भविष्य धोक्यात आले आहे. यावर वरिष्ठ अधिकारी यांना तात्काळ चौकशी लावून कारवाई करून परवाना रद्द करण्याची माहिती देताना शेकडो नागरिकांनी मागणी केली आहे.

मागील अनेक दिवसांपूर्वी पासून लाखनी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी शेती व्यवसायाला सुरुवात करून धान पिकाची लागवड सुरू केलेली आहे. या गरिबा लागणारे वाहन म्हणजे ट्रॅक्टर या साधनाचा वापर करणे शेतकऱ्यांना अगत्याचे  झाले आहे.