आयकाॅन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचा अभुतपूर्व उद्घाटन सोहळा...

आयकाॅन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचा अभुतपूर्व उद्घाटन सोहळा...

प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

आयकाॅन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचा अभुतपूर्व उद्घाटन सोहळा. सिने अभिनेता मकरंद अनासपूरे यांची उपस्थिति केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा.ना.डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आले असून अध्यक्ष म्हणून लातूर येथील सहकार महर्षी तथा माजी राज्यमंत्री श्री.दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

लातूर येथील पहिल्या किडनी प्रत्यारोपण सेंटरचे तथा आयकॉन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे समाजातील सर्वच स्तरातील नामांकितांच्या हस्ते उद्घाटन पार पडले.एकाच छताखाली सर्व सुविधांची उपलब्धी होणार असलेल्या या भव्य-दिव्य हॉस्पिटलचे उद्घाटन अगदी थाटामाटात संपन्न झाले. उद्घाटन समारंभ दरम्यान विविध रंगतदार कार्यक्रमांसह स्नेहभोजनाच्या दर्जेदार मेजवानीसह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दैदिप्यमान सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा.ना.डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आले असून अध्यक्ष म्हणून लातूर येथील सहकार महर्षी तथा माजी राज्यमंत्री दिलीपराव देशमुख उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासह डॉ.सुधीर निकम हे लाभले होते.