पांढरवाणी बीटात अवैध वृक्षतोड? वनपरिक्षेत्र अधिकारी साहेब ही वृक्षतोड कुणाच्या आशिर्वादने...

पांढरवाणी बीटात अवैध वृक्षतोड? वनपरिक्षेत्र अधिकारी साहेब ही वृक्षतोड कुणाच्या आशिर्वादने...

NEWS15 प्रतिनिधी - सुधीर शिवणकर

सडकअर्जुनी : गोंदिया वन विभागाअंतर्गत येत असलेल्या; वनपरिक्षेत्र सडक/अर्जुनी सह वनक्षेत्र शेंडा अंतर्गत बीट पांढरवाणी येथील शेतीला लागून.! पी. एफ ६७१ संरक्षित राखीव जंगलात अवैध वृक्षतोड करण्यात आली आहे. याप्रकरणाची तक्रार क्षेत्र सहायक शेंडा यांना देण्यात आलीय.

पांढरवाणी येथील शेतकरी शैलेश मदनलाल ऊईके, हौसलाल धनलाल नागपूरे यांची शेती; पी. एफ ६७१ संरक्षित राखीव जंगलाला लागून आहे. सध्या शेतीचे हंगाम सुरू असून, शेतीचे कामे करण्यासाठी कातलवाई (रिठी) बीट पांढरवाणी येथे शेतात गेले असता; त्यांच्या शेतीला लागून संरक्षित राखीव जंगलात अवैध वृक्षतोड करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. सदर सौरक्षित राखीव जंगलातील सागवन झाडे ही शेतकऱ्यांनी तोडले असा गैरसमज वनविभागाला होऊ नये म्हणून, या प्रकरणाची तक्रार क्षेत्रसहायक शेंडा यांना सदर शेतकऱ्यांनी केलीय. वनविभागाने संरक्षीत राखीव जंगलात होत असलेली वृक्षतोड थांबवावी व होणारा जंगलाचा -हास कमी व्हावा. आणि केलेल्या अवैध वृक्षतोडीचा पंचनामा करून सदर सागवन झाडे वनविभागाचे कार्यालयात जमा करावे. तसेच या अवैध वृक्षतोडीचा तपास करून वृक्षतोड करणाऱ्या टोळीचा शोध घेऊन त्यांचेवर वन गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.‌

सध्या सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोडीचे प्रमाण वाढत असून, अवैध वृक्षतोडीची चर्चा संपूर्ण वनपरिक्षेत्रत गाजत आहे. नेहमी वृत्तपत्रात सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रातील अवैध वृक्षतोडीच्या बातम्या येत असतात. मात्र याकडे वरिष्ठ वन अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्याने, वनतस्कर खुलेआम संरक्षित राखीव जंगलातील मौल्यवान लाकडांची वृक्षतोड करीत आहेत. या वनतस्करांना वनविभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे वरदहस्त असल्याचे बोलल्या जाते.