कादवाचे ऊस बिलापोटी पहिला हप्ता रु. 2,500 पेमेंट बँक खाती वर्ग...

कादवाचे ऊस बिलापोटी पहिला हप्ता रु. 2,500 पेमेंट बँक खाती वर्ग...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

 कादवा सहकारी साखर कारखान्याने यंदा गाळप केलेल्या उसाचे एफआरपी बिलापोटी पहिला हप्ता रु.2500 प्र.मे.टन ऊस उत्पादकांच्या बँक खाती वर्ग केल्याची माहिती कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी दिली.

कादवा सहकारी साखर कारखान्याने यंदाचे गळीत हंगाम सुरू असून आज अखेर 64,307 में.टन ऊसाचे गाळप होत सरासरी साखर उतारा 10.01% मिळत 64,100 क्विंटल साखर निमिर्ती झाली आहे. तसेच डिस्टीलरी प्रकल्प ही सुरू असून 4,49,205 लिटर स्पिरीट निर्मिती झाली आहे.अत्यंत बिकट स्थितीत सर्व साखर कारखाने वाटचाल करीत असताना कादवाने उसाचे एफ आर पी बिलापोटी पहिला हप्ता 2500 दिला आहे. कादवाने सातत्याने जिल्ह्यात सर्वाधिक उसाला भाव दिला असून जास्त भाव देण्याची परंपरा कायम ठेवली जाणार आहे.ऊस तोडीचा कार्यक्रम आखत योग्य नियोजन केले असून वेळेत ऊस तोड होणार आहे तरी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कादवाला ऊस पुरवठा करावा असे आवाहन चेअरमन श्रीराम शेटे,व्हा चेअरमन शिवाजीराव बस्ते यांनी केले आहे. यावेळी सर्व संचालक,प्रभारी कार्यकारी संचालक विजय खालकर सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

कादवाला ऊस पुरवठा करावा...

कादवा चे गाळप पूर्ण क्षमतेने सुरू असून कादवा उसाला सर्वाधिक ऊस  दर सातत्याने देत आला आहे यंदा एफआरपी पोटी पहिला हप्ता रू. 2500 ऊस उत्पादक यांचे बँक खाती वर्ग केला असून हंगाम संपताच शासन नियमानुसार अंतिम एफआरपी दर ठरणार आहे.वेळेत एफआरपी अदा करत सर्वाधिक ऊस भाव देण्याची परंपरा कायम राखली जाणार आहे तरी शेतकऱ्यांनी कोणतीही घाई न करता ऊस तोडणी कार्यक्रमानुसार ऊस तोड करत कारखान्याचे उज्वल भवितव्यासाठी कादवा लाच ऊस पुरवठा करावा.

श्रीराम शेटे - चेअरमन कादवा सहकारी साखर कारखाना