करंजवण, लखमापूर येथे शुक्रवारी ऊस पिक परिसंवाद मेळावा...

करंजवण, लखमापूर येथे शुक्रवारी ऊस पिक परिसंवाद मेळावा...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

कादवा सहकारी साखर कारखान्यातर्फे ऊस उत्पादक यांच्यासाठी ऊस पिक परिसंवाद मेळाव्याचे (शेतकरी मेळावा) आयोजन; शुक्रवार दि.१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह करंजवण येथे तर दुपारी ३ वाजता श्रीराम मंगल कार्यालयात लखमापूर येथे, तसेच दि.२ सप्टेंबर शनिवार रोजी सकाळी ११ वा. सोसायटी सभागृह, दिंडोरी येथे; चेअरमन श्रीराम शेटे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे.

ऊस पिक परिसंवाद कार्यक्रमात एकरी ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचनाद्वारे पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापण, ठिबक सिंचन देखभाल व निगा या विषयावर नेटाफिम इरिगेशन इंडिया कंपनीचे कृषी विद्या प्रमुख व ऊस विकास तज्ञ अरुण देशमुख हे प्रशिक्षण व मार्गदर्शन करणार आहेत. तरी याचा जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.असे आवाहन संचालक मंडळ, प्रभारी कार्यकारी संचालक विजय खालकर, मुख्य शेतकी अधिकारी मच्छिंद्र शिरसाठ यांनी केले आहे.