केबल स्टे ब्रिज बनला आकर्षणाचा केंदबिंदू.! १४७कोटी रुपये खर्च करून बनविला भारतातील पहिला केबल ब्रिज...

केबल स्टे ब्रिज बनला आकर्षणाचा केंदबिंदू.! १४७कोटी रुपये खर्च करून बनविला भारतातील पहिला केबल ब्रिज...

NEWS15 प्रतिनिधी - सुधीर शिवणकर

भंडारा : विकास तीर्थ दर्शन भंडारा - गोंदिया हा कार्यक्रम आंबोरा  येथे संपन्न झाला असून, गोंदिया-भंडाऱ्याचे खासदार सुनील मेंढे, गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजकुमार बडोले, माजी खासदार शिशुपाल पटले आणि ईतर पाहुण्याच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.

भंडारा-आंबोरा  येथे झालेला हा ब्रिज देशाचे नेते नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झाला आहे. त्यांनी या ब्रीज ला 147 कोटी रुपये मंजूर करून दिले. हा ब्रिज नागपूर-भंडारा या दोन जिल्ह्यांना जोडणारा ब्रिज असून, हा भारतातील असा पहिला ब्रिज आहे की, तो केबल स्टे ब्रिज आहे. ब्रिज च्या मध्यभागी  पन्नास फुट उंच गॅलरी बनविण्यात आली, त्यात पर्यटक बसुन चार ही बाजूचा निसर्गाचा आनंद घेऊ शकतो; आणी त्या गॅलरीची लांबी 33 मीटर तर रुंदी सात मीटर असून, तिथे जायला लिप्ट व पायर्‍या तयार करण्यात आल्या आहेत. हा ब्रिज एक आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरेल असे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले आहे.