सारा वसाहतीच्या सी-फेजच्या, सी-१० चे कारभारी बदलले, अध्यक्ष व खजिनदार बदलले...!
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : सारा वासाहतीच्या सी-फेजच्या सी-१० चे कारभारी यांच्यामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. सी-१० च्या अध्यक्ष पदाचा कारभार आता अमोल गोडसे यांच्या ऐवजी निलेश यादव हे बघणार आहेत. तर, खजिनदार पदाचा कारभार अनंत तिवारी यांच्या ऐवजी अस्लम मुजावर हे बघणार आहेत.

सारा वसाहतीच्या सी-१० च्या कारभारावर मागील बऱ्याच दिवसापासून प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे सी-१० मध्ये मोठ्या प्रमाणात प्रश्नाचा डोंगर उभा राहिला होता तो सोडविण्यासाठी सोसायटीच्या काही जेष्ठ सदस्य यांनी यापुढे जे सोसायटीसाठी वेळ देतील आणि कामे तडीस नेतील त्याच व्यक्तींना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे नवीन सदस्य यांना अध्यक्ष व खजिनदार पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे नव्याने नियुक्त झालेल्या कारभाऱ्यावर आता मोठी जबाबदारी आणि प्रलंबित राहिलेले कामे करण्याची जबाबदारी आहे.
सर्व नवनियुक्त अध्यक्ष व खजिनदार यांचे सोसायटीचे इतर सदस्य व सोसायटीचे सभासद यांनी अभिनंदन करून त्याना शुभेच्छा दिल्या...