भास्कर भगरे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा होणार...
![भास्कर भगरे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा होणार...](https://news15marathi.com/uploads/images/202312/image_750x_658ed99e1d3b9.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण
दिंडोरी (नाशिक) : अवकाळी व गारपीटमुळे शेतकरी हैराण झाले असून, शासनाने शेतकर्यांना कुठल्याही प्रकारची मदत दिली नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असल्याने याबाबतची शेतकर्यांची जाण असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर भगरे यांचा वाढदिवस साधेपणाणे साजरा होणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांचे अवकाळी व गारपीटने कांदा, द्राक्ष, टोमॅटो, भाजीपाला व इतर सर्वच शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतू, आजपर्यंत सरकारने शेतकर्यांना कोणत्याच प्रकारची मदत केली नाही. त्यामुळे शेतकरी व शेतीवर अवलंबुन असलेल्या सर्वच घटक हवालदिल झाले असून, आर्थिक संकटात सापडले आहे. दुसर्या बाजूला मराठा समाजाचे आरक्षणासाठी चालू असलेले आंदोलन, आदिवासी, धनगर, ओबीसी समाजात चालू असलेले आंदोलन यामध्ये सत्ताधारी केंद्र व राज्य सरकारची या सर्व प्रश्नांबाबत दुटपी भुमिका, आजमितीला शेतीमालाला योग्य भाव नाही. तसेच सर्वच प्रश्न समाजात भेडसावत असतांना माझ्या सारख्या आदिवासी, शेतकरी, सुशिक्षित, शिक्षक असलेल्या तुमच्यातील असलेल्या मान माझा वाढदिवस वाजत गाजत करणे, बॅनरबाजी करणे, हारतुरे स्विकारणे या गोष्टी करणे योग्य वाटत नाही. तरी सर्वांना विनंती आहे की, दि.1 जानेवारी 2024 रोजी होणारा माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतांना कुठल्याही प्रकारचे हारतुरे, शाली, होर्डीग लावू नये असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर भगरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.