जिल्हा बँकेची जुलमी वसुली थांबवा.! शेतकऱ्यांची निवेदनाद्वारे मागणी...

जिल्हा बँकेची जुलमी वसुली थांबवा.! शेतकऱ्यांची निवेदनाद्वारे मागणी...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

जिल्हा बँकेची जुलमी वसुली थांबविण्यात यावी, तसे न घडल्यास जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. जर उद्या कमी-जास्त काही घडल्यास शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यास याची जबाबदारी जिल्हा बँक व शासनाची राहील; असा इशारा ग्रामस्थांच्यावतीने तहसीलदारांना निवेदनद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मागील काळात शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. अवकाळी पाऊस, वाढती महागाई, पेस्टीसाईट सारख्या कंपन्यांनी औषधांवर महागाई तसेच डिझेल, पेट्रोलचे भाग गगनाला भिडले आहे. यामुळे शेतकर्‍यांनी मोठ्या अडचनीत सापडलेला आहे. शेतकर्‍यांच्या मुला - बाळांचे शिक्षणाचा प्रश्न असेल किंवा त्यांच्या प्रपंचाचा प्रश्न असेल या सर्व गोष्टींना शेतकर्‍यांनी कर्ज घेतले आहे. परंतु परतफेड झाली नाही. या सर्व अडचनी बघता शासनाने हि बाब विचारधिन धरून शेतकर्‍यांचा 7/12 कोरा करावा, जी चाललेली जुलमी वसुली तात्काळ थांबविण्यात यावी. तसे न घडल्यास जिल्ह्यातील संपुर्ण शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.जर उद्या कमी-जास्त काही घडल्यास शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यास याची जबाबदारी जिल्हा बँक व शासनाची राहील, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

यावेळी रा. कॉ. तालुकाध्यक्ष भांस्कर भगरे, संतोष रेहरे, गुलाब शिंगाडे, विजय गांगुर्डे, सुदाम पवार, सागर गुंबाडे, विकास धात्रक आदी उपस्थित होते.