युनियन बँक ऑफ इंडियावतीने, बँक कर्ज वितरण मेळाव्याचे आयोजन...
![युनियन बँक ऑफ इंडियावतीने, बँक कर्ज वितरण मेळाव्याचे आयोजन...](https://news15marathi.com/uploads/images/202310/image_750x_6537486cc6bd6.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - राजु जांभुळे, उमरेड
युनियन बँक ऑफ इंडिया; शाखा उमरेड व मकरधोकडा शाखेच्यावतीने, उमरेड व भिवापूर तालुक्यातील उमेद अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता समुहाकरीता दि. २३ऑक्टोबर रोजी कर्ज मेळावा संपन्न झाला.
या कार्यक्रमाला युनियन बँक ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर मनोजकुमार नंदा, रीजनल मॅनेजर राजेशकुमार यादव, झोनल मॅनेजर स्वप्नील आणि बुटीबोरी येथील शाखा व्यवस्थापक उपस्थित होते.
यावेळी उमेद अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता समूहांना एकत्रितरित्या 300 लक्ष रुपयांचे कर्ज मंजूर करून, समूहांना मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यासोबतच बँकेचे मुद्रा कर्जे व वैयक्तिक कर्जाचे सुद्धा वितरण यावेळी करण्यात आले. कार्यक्रमास समूह संसाधन व्यक्ती, बँक सखी व उमरेड तालुक्यातील महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या महिला उपस्थित होत्या.