खोदलेल्या नालीमध्ये धानाचा ट्रक फसल्याने वाहतूक ठप्प...

खोदलेल्या नालीमध्ये धानाचा ट्रक फसल्याने वाहतूक ठप्प...

NEWS15 प्रतिनिधी - सुधीर शिवणकर

गोंदिया: सडक/अर्जुनी तालुक्यातील मालीजुंगा - धानोरी मार्गावरील धानोरी येथील जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळेजवळ धान भरलेला ट्रक रस्त्यावर खोदलेल्या नालीमध्ये फसल्याने; दोन दिवसांपासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

धानोरी येथे जलजीवन मिशन योजना अंतर्गत पाईपलाईनसाठी रस्त्याचे कडेला खोदण्यात करण्यात आले असून, पाईप लाईन बुजवून दबाई न केल्यामुळे; सदर ठिकाणावरून धान भरलेला ट्रक MH35 AJ3112 या क्रमाकांचे ट्रक २०० बोरे धान घेऊन जात असताना ट्रक फसला आहे.

विशेष म्हणजे धानोरी जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या समोर एम.एच.३५ सी. ८५९७ या क्रमाकांचे ट्रॅक्टर ट्राॅली पंक्चर असून, अनेक दिवसापासून रस्त्याचे किना-यावर ठेवली आहे. तसेच धानोरी-चिचटोला रस्ता बांधकामासाठी बांधकाम विभागाची पाण्याची टॅंकर शाळेच्या समोर असल्याने; धान भरलेला ट्रक काढतांनी ट्रकचे एका बाजूचे चाक दोन फुट नालीत फसल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.