कादवा सहकारी साखर कारखान्याची; बुधवारी वार्षिक सर्वसाधारण सभा...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याची ५२ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा; उद्या बुधवार दि. २७ रोजी दुपारी दुपारी 2 वा. चेअरमन श्रीराम शेटे यांचे अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती व्हा. चेअरमन शिवाजीराव बस्ते आणि प्रभारी कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी दिली आहे.
कादवाने २०२२ - २३ गळीत हंगामात १२२ दिवसात ३,०३,१७५ मेटन उसाचे गाळप करून, सरासरी ११.५०% साखर उतारा मिळवत ३,४८,६०० क्विंटल साखर निर्मिती केली होते. इथेनॉल आसवानी प्रकल्पातून पहिल्याच हंगामात ५४ दिवसात २१,७९,३३० लिटर रेक्टीफाइड स्पिरीट निर्मिती केली आहे. कादवाची ऊसाची एफ.आर.पी. प्रती टन रू. २७०२.३५ संपूर्ण ऊस उत्पादकांच्या खाती वर्ग करण्यात आली आहे. कादवाला लेखा परीक्षणात अ वर्ग मिळालेला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा होणार असून, सर्व सभासदांनी सदर सभेस उपस्थित राहावे उपस्थिती नोंदविणेसाठी ओळखपत्र (स्मार्ट कार्ड) सोबत घेवून यावे असे आवाहन संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.