दिंडोरी येथे २९ ला चक्काजाम आंदोलन - संतोष रेहरे

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे परिपत्रक काढले आहे; त्या परिपत्रकात धनगर समाजाला आदिवासी जमातीमध्ये विलीन करण्यात यावे असा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे. धनगर समाजाला आदिवासी एसटी जमातीमध्ये समाविष्ट करण्याबाबत जे परिपत्रक काढण्यात आले आहे.! त्याचा निषेध करण्यासाठी दिंडोरी येथे शुक्रवारी दि. २९ रोजी सकाळी १० वा. चक्काजाम आंदोलन छेडण्यात येणार असून, यात हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी होणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते व अंबानेरचे माजी सरपंच संतोष रेहरे यांनी दिली.
आदिवासी जमातीला ७ टक्के असे स्वतंत्र आरक्षण दिले आहे. तरी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दोन्ही समाजामध्ये भांडण लावून, देशात व राज्यात दंगली घडून देशात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी त्याचा निषेध करण्यासाठी दिंडोरी तालुक्यातील सकल आदिवासी समाज शुक्रवार दि.२९ रोजी दिंडोरी येथील मार्केट कमिटी येथील मैदान ते तहसील कार्यालय पर्यंत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनामध्ये आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संतोष रेहरे यांनी केले आहे.