अक्राळे येथील जय योगेश्वर पतसंस्थेला सहकार पेरणा पुरस्कार...

अक्राळे येथील जय योगेश्वर पतसंस्थेला सहकार पेरणा पुरस्कार...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथील जय योगेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला उत्कृष्ट कामगिरीबद्दल गोवा येथे सहकार प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

नाशिक जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष सुनिल ढिकले व कार्याध्यक्ष नारायणशेठ वाजे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला, संस्थेचे चेअरमन जी.एम.गायकवाड यांनी आपल्या संचालक मंडळासह तो स्विकारला,यावेळी संस्थेचे संचालक नरेश देशमुख,निलेश गायकवाड, अरुण फलाने रशीद पिंजारी विवेक घडूसे, व्यवस्थापक तानाजी गायकवाड आदींसह कर्मचारी उपस्थित होते.यावेळी मान्यवरांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.