नगरपरिषद हदगांव पीएम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून, पथविक्रेत्यांना कर्ज वाटप...
![नगरपरिषद हदगांव पीएम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून, पथविक्रेत्यांना कर्ज वाटप...](https://news15marathi.com/uploads/images/202309/image_750x_6503224212e65.jpg)
NEWS15 प्रतिनिधी - बालाजी घडबळे, नांदेड
कोवीड-19 साथीचा रोग सर्वत्र पसरलेला असल्यामुळे आणि परीणामी LOCKDOWN असल्याने, पथविक्रेत्यांच्या (फेरीवाला) उपजीवीकेवरती विपरीत परिणाम झालेला होता. बहुदा ते कमी भांडवलावर पथविक्री करतात आणी जे काही भांडवल त्यांच्याकडे होते ते ही टाळेबंदीमध्ये (लॉकडाऊन) मुळे शिल्लक राहण्याची शक्यता ही कमीच आहे. म्हणुन शहरातील पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM Svanidhi) पथविक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म - पतपुरवठा सुविधा केंद्राशासनामार्फत सुरु करण्यात आली आहे.
नगरपरिषद हदगांवच्यावतीने शहरातील पथविक्रेत्याला PMSVANIDHI योजनेअंतर्गत 7 लाभार्थ्याना प्रत्येकी रुपये 50,000 पथविक्रेत्यास योजनेच्रा निकषाप्रमाणे स्टेट बॅक ऑफ इंडीयावतीने कर्ज वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास सेवानिवृत्त श्रेत्रीय व्यवस्थापक अशोक सहिता, बॅकेचे व्यवस्थापक अभिषेक रोहतगी, बॅकेचे श्रेत्रीय अधिकारी नितीनकुमार वानखेडे व नगरपरिषद हदगांव चे मुख्याधिकारी नितीन लुंगे यांच्या हस्ते कर्ज मजुरीपत्र देऊन त्याच दिवशी 7 पथविक्रेत्याना / फेरीवाल्यास कर्ज वाटप करण्यात आले.
आतापर्यत शहरात प्रथम कर्ज रु.10000/- एकुण 356 लाभार्थ्याना दुसरे कर्ज रु. 20000/- एकुण 171 लाभार्थ्याना व तिसरे कर्ज रु. 50000/- एकुण 19 लाभार्थ्याना वाटप करण्यात आले. ज्या मध्ये स्टेट बॅक ऑफ इंडीया शाखा हदगांवच्यावतीने आतापर्यत एकूण रुपये 5030000/- वाटप झाले आहेत. तर महाराष्ट ग्रामीण बॅक शाखा हदगांवच्यावतीने एकुण रुपये 2860000/- असे एकत्रीत रुपये 7890000/- कर्ज वाटप झाले आहेत.
शहरातील पथविक्रेत्याकरीता आर्थिक साक्षरता अभियान अंतर्गत ऑनलाईन व्यवहार, बचतखाते, चालुखाते, व्यवहार ATM मोबाईल बॅकीगचे व्यवहार, UPI id, Googly Pay, Phone Pay, Bhim App ने व्यवहार करण्यासंदर्भात तसेच PMJJY व PMJSY विमा बाबत बॅकेचे श्रेत्रीय अधिकारी नितीनकुमार वानखेडे यांनी पथविक्रेताना मार्गदर्शन केले.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नितीन लुंगे साहेब यांनी सर्व लाभार्थ्याना या योजनेच्या लाभ जास्तीत जास्त घ्यावा तसेच अदयाप ज्या पथविक्रेत्याने योजनेचा लाभ घेतला नाही त्यानी त्वरीत ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास कार्यालयीन अधिक्षक सतीश देशमुख, सहाय्यक प्रकल्प अधिकारी बोरकर एस.ए. , करनिर्धारक सागर मंगनाळे, बॅकेचे सहकारी गजानन करडखेले, संकेत भोस्कर, प्रणाली मुजमुले व पथविक्रेता आदीची उपस्थिती होती.
हदगांव शहरात PMSVANIDHI योजना अंतर्गत नगरपरिषद कार्यालय हदगांवच्यावतीने शहरातील ज्या पथविक्रेत्याने अदयाप ऑनलाईन भरले नाहीत. त्यांनी त्वरीत ऑनलाईन अर्ज भरुन योजनेचा जास्तीत जास्त पथविक्रेत्यानी लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन मुख्याधिकारी नितीन लुंगे यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) मदत कक्ष बोरकर एस.ए. (सहाय्यक प्रकल्प अधिकारी) नगर परिषद हदगांव यांच्याशी संपर्क करण्यात यावा. सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन बोरकर एस.ए. यांनी केले.