प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्रमाणपत्र वाटप...

प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्रमाणपत्र वाटप...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख

लातूर : रीड इंडिया नवी दिल्ली व शिवशक्ती ग्राम विकास प्रतिष्ठान कोळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने; किनगाव येथे चालू असलेल्या स्किल टू सक्सेस सेंटर येथे कौशल्य प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना व मुलींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

यावेळी अध्यक्षस्थानी रीड इंडिया नवी दिल्लीच्या कंट्री डायरेक्टर गीता मल्होत्रा होत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार बाबासाहेब पाटील, शिवानंद हेंगणे, हर्ष अरोरा, सपोनी भाऊसाहेब खंदारे, उपसरपंच विठ्ठलराव बोडके, शंकर गुट्टे, कोळवाडी सरपंच रंजना दहिफळे, सहसंचालक राम दहिफळे, शिवशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत दहिफळे आदी जण उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार बाबासाहेब पाटील यांनी, सर्व क्षेत्रात महिला मुली पुढे आल्या आहेत तुम्ही पण शिक्षण घेऊन संधीचे सोने करावे, असे आवाहन केले व महिलांना कौशल्यानुसार प्रशिक्षण घेण्याचा मार्ग दिल्याबद्दल राम दहिफळे व वसंत दहिफळे यांचे अभिनंदन केले.

रीड इंडियाच्या डायरेक्टर गीता मल्होत्रा यांनी सांगितले की ग्रामीण भागातील व शहरी भागातील मुलींना व महिलांना कौशल्य प्रशिक्षण घेता यावे याकरिता विविध प्रकारचे कोर्सेस उपलब्ध केले आहेत यात महिला व मुलींसाठीसाठी टेलरिंग कोर्स, बेसिक ब्युटी पार्लर, बेसिक कम्प्युटर कोर्स, नर्सिंग असिस्टंट कोर्स, सर्वांसाठी लायब्ररी, महिला व मुलींसाठी मसाले प्रशिक्षण, आदी कौशल्य प्रशिक्षण दिले जात असून महिलाही प्रशिक्षण घेण्यासाठी पुढे येत आहेत असे सांगितले यावेळी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.