गळीत हंगामाची सुरुवात होताच; ऊसतोड मजूरांची कारखान्यांच्या दिशेने वाटचाल...
![गळीत हंगामाची सुरुवात होताच; ऊसतोड मजूरांची कारखान्यांच्या दिशेने वाटचाल...](https://news15marathi.com/uploads/images/202311/image_750x_6547044742aa7.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
यावर्षी पावसाने अल्प हजेरी लावल्यामुळे, अनेक ठिकाणी दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाल्याने मजूर वर्गाची स्थितीही दिवसेंदिवस अवघड होत असल्याने हाताला काम मिळावे व दोन पैसे मिळतील या असेपोटी; ऊसतोड मजूर आपल्या परिवारासह संसारोपयोगी साहित्य बांधून सर्जा राजाचे जोड आपल्याबरोबर घेऊन कारखान्यांकडे रवाना होत आहे.
ऊस तोडीच्या आधारे हाताला काम मिळणार असून, दोन पैसे मिळतील यासाठी अनेक गावच्यागाव रिकामी होऊ लागली असून, ही मंडळी आपल्या कुटुंबासह जनावरे व रोजी रोटीचा प्रश्न सुटणार असल्याने कारखान्यांकडे वळाली आहे. काहीजण बैलगाडी तर काही ट्रक, ट्रॅक्टर मधून साहित्य बांधून आगमन करीत आहे. तर ज्येष्ठ व विद्यार्थी घर सांभाळण्यासाठी गावातच थांबत आहे.
चार ते पाच महिने कारखान्याचा सीझन असल्यामुळे ही कुटुंबे स्थलांतरित होत असतात घरची परिस्थिती व शाळांची सोय नसल्याने या मजुरांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असते; असे असले तरी पोटाची खळगी भरण्यासाठी ही एक संधी साधून आपल्या कुटुंबाचा व जनावरे यांचा प्रश्न सुटणार असल्याने हे ऊसतोड कारखान्यांकडे घेत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.