वाघाड दुध उत्पादक असोसिएशन संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न...

वाघाड दुध उत्पादक असोसिएशन संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

वलसाड जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्या. अलिपुर (गुजरात) प्राणित वाघाड दुध उत्पादक असोसिएशन या संस्थेची १ ली वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दि. ११ रोजी सायं. ६.३० वाजता संस्थेचे कार्यालय या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष शरद एकनाथ मालसाने यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

करंजवण दुध शितकरण केंद्राचे इनचार्ज अम्बेदकर पर्यवेक्षक अरुण जाधव,सुनिल देशमुख हे उपस्थित होते. तसेच संस्थेचे मा. संचालक व दुध उत्पादक उपस्थित होते.

सभेमध्ये संस्थेचा सन २०२३-२४ या सालाचा आर्थिक लेखाजोखा करंजवण दुध शितकरण केंद्राचे पर्यवेक्षक अरुण जाधव यांनी सभेपुढे मांडला. संस्था दि. १४/११/२०२३ रोजी सुरू झाली.संस्था नविन असतानाही संस्थेला ३.५ महिन्यातच ४९२८६.२१ रुपये निव्वळ नफा झाला.सभेत दुध उत्पादकांना प्रोत्साहन म्हणुन घड्याळ वाटप करण्यात आले. अरुण जाधव यांनी सहकारातून संस्था कशाप्रकारे आर्थिक सक्षम करावी याबाबत मार्गदर्शन केले. स्वच्छ दुध उत्पादन व दुधाची गुणवत्ता सुधारणे बाबत तसेच वासरी व गायीची काळजी घेऊन तिला खाद्य किती प्रमाणात व कसे द्यायचे त्यातून होणारे फायदे मिळणारे उत्पन्न यावर अम्बेदकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष शरद एकनाथ मालसाने यांनी सभेस संबोधित करताना संस्था कासवाच्यागतीने चालत असुन भविष्यात नक्कीच संस्थेचा वट वृक्ष होईल.तसेच दुध उत्पादकांनी संस्थेवर टाकलेल्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही व संस्थेचा कारभार नेहमी पारदर्शक राहीलअशी सर्व संचालक मंडळाच्या वतीने ग्वाही दिली.

संस्थेची सभा अत्यंत शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सूत्रसंचालन अरुण जाधव यांनी केले तर सचिव लखन शंकर मालसाने यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.