दिंडोरी शहरात गणपती मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव...

दिंडोरी शहरात गणपती मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी नगरपंचायतीच्यावतीने माझी वसुंधरा अभियान ५.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत वसुंधरेचे जतन व पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने दि.१७ /०९/२०२४ रोजी दिवसभर शहरात ठीक ठिकाणी कृत्रिम तलावाची उभारणी करण्यात आलेली आहे. 

दिंडोरी शहरात घराघरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून प्रथेप्रमाणे श्री गणेश मूर्ती विसर्जन जवळ व सुरक्षित होण्यासाठी दिंडोरी नगरपंचायतीच्या वतीने पुढील प्रमाणे कृत्रिम तलावाची व्यवस्था केलेली आहे. १. रामेश्वरी बंधारा, बस स्थानक जवळ, २.कोंगाई माता मंदिर, निळवंडी रोड, ३.अंगणवाडी, कादवा नगर, ४.ज्ञानगंगा क्लासेस जवळ, शिवाजीनगर, ५. समाज मंदिर, संत रोहिदास नगर इत्यादी.. तरी दिंडोरी शहरातील गणेश भक्तांनी आपल्या गणपती मूर्तीचे विसर्जन या कृत्रिम तलावात करण्याचे आवाहन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संदीप चौधरी यांनी केले आहे.