कादवाची सवलतीच्या दरातील साखर ३० एप्रिल पर्यंत...

कादवाची सवलतीच्या दरातील साखर ३० एप्रिल पर्यंत...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

कारखान्याच्या सर्व पात्र सभासदांना सवलतीच्या दरात दिली जाणारी साखर ३० एप्रिल पूर्वी कारखान्यावरून घेऊन जावी असे आवाहन कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले आहे. 

कारखान्याच्या संचालक मंडळाच्या धोरणानुसार जून २०२३ ते एप्रिल २०२४ मध्ये पात्र सभासदांना सवलतीच्या दरात साखर वाटपाचा कार्यक्रम कारखाना कार्यस्थळावर राबवला जात आहे.ज्या सभासदांची साखर अद्यापही घ्यावयाची बाकी आहे त्यांनी दिनांक ३० एप्रिल २०२४ पर्यंत घेऊन जावी.त्यानंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नाही. तसेच ज्या सभासदांना अद्याप स्मार्ट कार्ड मिळालेले नाही,अशा  सभासदांनी गट कार्यालयाशी संपर्क साधुन आपले स्मार्ट कार्ड घेवुन जावे असे आवाहनही कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.