गाळप क्षमता वाढवणार - श्रीराम शेटे
![गाळप क्षमता वाढवणार - श्रीराम शेटे](https://news15marathi.com/uploads/images/202402/image_750x_65d0ec9d01e2f.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
कादवा सहकारी साखर कारखान्याचे इथेनॉल निर्मितीचे स्वप्न साकार होत केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या कोट्यानुसार कादवा ने ३,५०,००० लिटर इथेनॉल निर्मिती केली असून कादवाचे इथेनॉल पेट्रोलियम कंपनीकडे वितरण प्रक्रिया सुरू झाली आहे.पहिल्या इथेनॉल टँकर हिंदुस्तान पेट्रोलियम कंपणीला वितरित झाला त्या टँकरचे पूजन कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी श्रीराम शेटे यांनी सांगितले की केवळ साखर निर्मिती करून साखर कारखाने चालणे शक्य नसल्याने उपपदार्थ निर्मिती करणे अत्यावश्यक होते. कादवाने भविष्याचा वेध घेत इथेनॉल प्रकल्प हाती घेत सर्वांच्या सहकार्याने प्रकल्प कार्यान्वित झाला. या प्रकल्पामुळे कारखान्याचा फायदा होत स्थैर्य लाभणार आहे. बायोगॅस प्रकल्प सुरू झाला असून त्यामुळे ब गॅस बचत होणार आहे. कंपोस्ट खत निर्मिती झाली असून, त्याचे वितरण सुरू झाले असून सभासदांना उधारीत खत वाटप केले जात आहे.ऊस नोंद व तोडणीचे योग्य नियोजन करण्यासाठी गावनिहाय ऊस उत्पादक यांची समिती गठीत करून ऊस तोडणी चे नियोजन करण्यात येईल असे सांगून जास्तीत जास्त ऊस लागवड करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी व्हा.चेअरमन शिवाजीराव बस्ते दादासाहेब पाटील, बाळकृष्ण जाधव, शहाजी सोमवंशी, दिनकरराव जाधव, विश्वनाथ देशमुख, बापुराव पडोळ, सुखदेव जाधव, सुभाष शिंदे, अमोल भालेराव, मधुकर गटकळ, सुनिल केदार, राजेंद्र गांगुर्डे, चंद्रकला घडवजे, शांताबाई पिंगळ, भगवान जाधव, संपतराव घडवजे, निवृत्ती देवरे, नारायण गणोरे, दिलीप शिंदे, बाळासाहेब ढुमणे, उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक डमरे, काटा निरीक्षक सिंग, मातेरेवाडीचे माजी सरपंच राजाराम सोनवणे, सागर गटकळ, भाऊसाहेब उगले, बाळासाहेब महाले, प्रभारी कार्यकारी संचालक विजय खालकर, राज्य बँकेचे निरीक्षक माधव पाटील, प्रशासकीय सल्लागार बाळासाहेब उगले, आर्थिक सल्लागार जे.एल.शिंदे, डिस्टीलरी प्रमुख सावंत, सचिव राहुल उगले, उप लेखापाल सत्यजित गटकळ, चीफ केमिस्ट अर्जुन सोनवणे, युनियन अध्यक्ष भगवान जाधव, कामगार कल्याण अधिकारी गणेश आवारी, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप तिडके, युनियन सरचिटणीस अजित दवंगे आदींसह अधिकारी कामगार उपस्थित होते.
गाळप क्षमता वाढवण्याचा विचार...
कादवा चे कार्यक्षेत्रात एकच वेळी ऊस लागवड होत असल्याने ऊस तोडीचे नियोजन विस्कळीत होत असून त्यासाठी गाळप क्षमता वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. कादवा ला 3500 गाळप क्षमतेचा परवाना मिळालेला असून कमी दिवसात जास्त गाळप करणे गरजेचे असल्याने गाळप क्षमता करण्याचा विचार करावा लागेल असे चेअरमन श्रीराम शेटे यांनी सांगितले.