पगार न झाल्याने टॉवरवर चढुन ग्रामपंचायत शिपायाची विरूगिरी...

पगार न झाल्याने टॉवरवर चढुन ग्रामपंचायत शिपायाची विरूगिरी...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधीर शिवणकर, गोंदिया

सडक अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम सावंगी येथील ग्रामपंचायतचे कर्मचारी देविदास लांजेवार या कर्मचाऱ्याचा ऑगस्ट २०२२ ते जानेवारी २०२४ पर्यंत'चा पगार न झाल्याने; कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. या चिंतेनं काल दि. 16/2/2024 ला संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास गावातील मोबाईल टॉवर वर चढला आणि पगाराबद्दल जो पर्यंत ग्रामपंचायत लेखी किंवा तोंडी सांगत नाही, तोपर्यंत टॉवर वरून खाली उतरणार नाही, अशी भुमिका त्यानं घेतली आणि कालची रात्र त्यानं टॉवरवरच काढली त्यामुळे चांगलीच तारांबळ उडाली.

ही माहिती पोलिसांना मिळताच डुगीपार पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हे आज सकाळच्या दरम्यान घटनास्थळी  दाखल झाले व त्याची समजूत काढून आज सकाळच्या दरम्यान त्याला टॉवरवरून खाली उतरविण्यात आले.