क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक महाविद्यालयात वाणिज्य मंडळ उद्घाटन संपन्न...

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक महाविद्यालयात वाणिज्य मंडळ उद्घाटन संपन्न...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक 

दिंडोरी येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक महाविद्यालयातील कॉमर्स विभागा अंर्तगत वाणिज्य मंडळ उद्घाटन आज मान्यवरांच्या हस्ते संपन झाले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उल्लास बोरसे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. राजेंद्र सांगळे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. रूपाली शिंदे,प्रा.श्रीमती वैशाली गांगुर्डे, तेजस्विता मुंढे आदी उपस्थित होते. प्रथमतः क्रांतिवीर वसंतराव नाईक व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजनाने करण्यात आले. यावेळी उल्लास बोरसे यांनी आपल्या जीवनातील अतिशय अडचणीच्या परिस्थितीचा अनुभव विद्यार्थ्यांना  सांगून, कोणत्याही परिस्थितीत आपण आपली मनाची तयारी ठेवली तर मोठे यश प्राप्त करू शकतो. तसेच योग्य व्यवसायाची निवड कशी करावी व ते कसे करावेत या बद्दल मार्गदर्शन दिले.                                                           

विद्यालयाचे प्रा.डॉ.राजेंद्र सांगळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की  विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केले तर यश लवकर मिळेल हे अनेक उदाहरनातून सांगितले.याप्रसंगी महाविद्यालयाचा कॉमर्स विभाग व उल्हास बोरसे अँड कंपनी यामध्ये विविध उपक्रमांसाठी सामंजस्य करार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रूपाली शिंदे यांनी केले.कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन प्रा.निकीता वाटाणे यांनी तर आभार  तेजस्विता मुंढे यांनी मांडले.

याप्रसंगी डॉ.रूपाली शिंदे प्रा. वैशाली गांगुर्डे तेजस्विनी मुंडे निकिता वाटाणे योगिता ढाकणे निलेश भारसाकाळ आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.