आनंदी सहवास शैक्षणिक सामाजिक संस्थेद्वारे आदिवासी भागात शैक्षणिक साहित्याचे वाटप

आनंदी सहवास शैक्षणिक सामाजिक संस्थेद्वारे आदिवासी भागात शैक्षणिक साहित्याचे वाटप

NEWS15 प्रतिनिधी -  बापू चव्हाण

दिंडोरी : नाशिक येथील आनंदी सहवास शैक्षणिक सामाजिक संस्थेद्वारे दिंडोरी तालुक्यातील आदिवासी भागात शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी के.पि.सोनार प्रयत्नाने तसेच पिंपळपाडा केंद्राचे केंद्रप्रमुख सचिन वसमतकर यांचे प्रमुख उपस्थितीत साहित्य वाटप करण्यात आले.

या संस्थेच्यावतीने दरवर्षी ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या असक्षम असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणसाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असते.सन २०२३,या शैक्षणिक वर्षांमध्ये दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागातील आदिवासी बहुल डोंगराळ आणि अतिपर्जन्याच्या प्रदेशातील जवळपास नऊ शाळांची निवड यावेळी करण्यात आली होती ज्यामध्ये धोंडाळपाडा,अंबाड,देवळीचापाडा, पिंपळपाडा,भनवड,वनारे,तळ्याचा पाडा,भोकरपाडा,वारे या शाळांचा समावेश होता.

कवी किरण सोनार आणि त्यांच्या संस्थेतील इतर देणगीदार आणि संस्थेचे पदाधिकारी यांनी सकाळी साडेनऊ वाजता धोंडाळ पाडा येथून साहित्य वाटपास प्रारंभ केला. मुलांना विविध कलागुणांना वाव देत,त्यांच्याशी संवाद साधून  त्यांच्या समस्या जाणून घेत.त्यांचा कल ओळखून त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळेल या दृष्टीने पूरक शैक्षणिक साहित्य ज्यामध्ये वह्या पुस्तके कंपास पेन पेन्सिल खेळण्या शब्दकोडे इत्यादी प्रकारचे साहित्याचे वाटप करण्यात आले.या नऊ शाळांमधील एकूण हजाराच्या आसपास लाभार्थी विद्यार्थ्यांना  साहित्य देण्यात आले. 

यावेळी किरण सोनार यांनी सांगितले की आम्ही काही देण्यासाठी येत नसून उलट अधिकाधिक ऊर्जा घेण्यासाठी आम्ही या भागामध्ये येत असतो की आम्हाला वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा आणि ग्रामीण भागातील जनतेशी विद्यार्थ्यांची नाळ जोडून घेताना सामाजिक बांधिलकीच्या प्रती कटिबद्धता व्यक्त करता येते अशा ऊर्जेमुळेच भविष्यात अनेक अनेक नवीन उपक्रम हाती घेऊन ते कार्यान्वित करता येतील यासाठी अनेक प्रकारचे दाते त्याचबरोबर आर्थिक भरभक्कम पाठीराखे तयार होतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी विविध शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक,शालेय समिती पदाधिकारी,नागरिक,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.