पोलीस उपमहानिरिक्षकांकडून शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याची वार्षीक तपासणी...
प्रतिनिधी - सुधाकर सूर्यंवशी, लातूर
शिरूर अनंतपाळ येथील पोलीस ठाण्यातील विविध खात्याची वार्षीक तपासणी; पोलीस उपमहानिरिक्षक परिक्षेत्र नादेंड.! शहाजी उमाप यांच्याकडून तपासणी करण्यात आली.
1995 नंतर पोलीस उपमहानिरिक्षकांकडून प्रतिवर्षा प्रमाणे होणाऱ्या तपासणीला स्वताः उपस्थित राहून, शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यातील विविध रेकार्डची अतिशय बारकाईने तपासणी केली. यात ठाण्याच्या परिसरासह अधिकारी रेकार्ड, कोर्ट, वारंट यांचीही तपासणी झाली. तसेच लॉकअप रूम, मुद्देमालाचे रेकार्ड यांची तपासणी करण्यात आली.
यावेळी लातूरचे पोलिस अधिक्षिक सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस अधिक्षिक सागर खर्डे, चाकूरचे उपविभागीय अधिकारी चंद्रकांत रेड्डी यांची उपस्थिती होती.
तपासणीनंतर तालुक्यांतील विविध गावातील पोलीस पाटील यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत पोलीस पाटलांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या त्यानंतर त्यांना त्यांच्या जवाबदाऱ्या या विषयी मार्गदर्शन केले व शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यातील कामकाजाबाबत पोलीस उपमहानिरिक्षक उमाप यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी पोलीस निरिक्षक विठ्ठल दराडे, पोलीस उपनिरीक्षक गजानन अन्सापुरे यांच्यासह पोलीस नाईक पोलीस जमादार यांची उपस्थिती होती .