दिंडोरी तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरती...

दिंडोरी तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरती...

प्रतिनिधी - बापू नाशिक, दिंडोरी

महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीस पदे भरण्यासाठी मान्यता दिली असून रिक्त पदे मार्च २०२५ अखेरपर्यंत भरली जाणार असून याबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.राज्यातील अंगणवाडी सेविकांनी मदतनीस भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आली असून नवीन निकष लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.या बदलामुळे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येणार असून उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार संधी दिली जाणार आहे. 

महिला आणि बाल विकास विभागाने ३० जानेवारी २०२५ रोजी शासन निर्णय जीआर जारी केला आहे हा शासन निर्णय एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आयसीडीएस) अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतीस भरतीसाठी लागू करण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार भरती प्रक्रियेसाठी गुणांकन प्रणाली बदलण्यात आली आहे उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आली अनुभव लक्षात घेऊन  गुण दिले जाणार आहे. 

९ सप्टेंबर २०२४ रोजी जारी करण्यात आलेले स्थगिती आदेश रद्द करण्यात आले आहेत. आधीच्या जाहिरातीद्वारे करण्यात आलेली भरती प्रक्रिया थांबून नव्याने भरती करण्यात येणार असून सुधारित शासन निर्णयानुसार नव्याने अर्ज मागविण्यात येणार आहेत या सुधारणेमुळे अंगणवाडी सेविका आणि मदतीस भरती प्रक्रिया अधिक नीटनेटके आणि पारदर्शक होणार आहे. यामुळे सर्व पात्र उमेदवारांना संधी मिळणार असून उमेदवारांची गुणवत्ता आणि अनुभव याला प्राधान्य दिले जाईल असा विश्वास जिल्हा परिषदेने व्यक्त केला आहे. दिंडोरी तालुक्यातही अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदांकरिता भरती होणार आहे पात्र उमेदवारांनी या पदासाठी अर्ज करावे असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी विलास कव्हळे यांनी केले आहे. 

यामध्ये शैक्षणिक अहर्ता बारावी उत्तीर्ण आहे वय १८ ते३५ दरम्यान असून विधवा महिलांसाठी वय ४०  वर्ष असणार आहे. उमेदवार स्थानिक रहिवासी असावा १० ते २४ फेब्रुवारी २०२५ दरम्यान अर्ज करावेत अंगणवाडी सेविका ११ व मदतनीस २० पदांची भरती प्रक्रिया होणार असून तरी पात्र महिला उमेदवारांनी अर्ज दाखल करून नोकरीचा लाभ घ्यावा असे आवाहन कव्हळे यांनी केले आहे.