निलंगा तालुक्यातील वडगाव'च्या शाळेत महिलांच्या खेळासह; हळदी कुंकवाचा कार्यक्रम...
प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी, निलंगा (लातूर)
निलंगा तालुक्यातील वडगाव येथे जि. प. प्र. शाळेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून, विविध खेळासह हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला .
वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेकडून महिला पालकांचा अधिकाधिक सहभाग वाढावा यासाठी; शाळेत हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. विशेष म्हणजे महिलांनी मिळून रस्सीखेच, संगीत खुर्ची अशी असे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेत कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी सर्वप्रथम पुनम माने यांनी आपल्या शालेय जीवनाला उजाळा देत स्वागत सादर केले. शाळेतील शिक्षिका गुडे मॅडम, सहशिक्षक सोळंके मॅडम, सहशिक्षक वाळके मॅडम, सहशिक्षक जिनेवाडे सर, सहशिक्षक मस्के सर व गावातील महिला पल्लवी झरे, शितल माने नंदिनी घुगे ,रवीना माने, मीरा शिरोळे यांनी परिश्रम घेतले.